gudhipadhwa mahiti in marathi
सर्वे दृष्टीने प्रसन्न
असणारा चैत्र महिना जेव्हा येतो ; हिंदू धर्मीयांच्या नववर्षालला प्रारंभ होतो.
आनंदाप्रित्यर्थ गुढी उभारून साजरा केला जाणारा सण ‘गुढीपाडवा’ .
![]() |
गुढी पाडवा |
गुढीपाडवा (
वर्षप्रतिपदा) हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो . हा दिवस पुण्यकाळासारखा म्हणून
नवीन कामाचा,कार्याचा शुभारंभ या दिनी केला जातो. या महिन्यात हवेतील गारवा कमी झालेला असतो व
उन्हाळ्याला प्रारंभ होतो. त्यामुळे
सुरुवातीच्या या उन्हाळ्याला तीव्रता नसते. यादिवशी पहाटे लवकर उठून मन व शरीर
प्रसन्न करण्यासाठी प्रातर्विधी उरकून स्नान केले जाते.
![]() |
in marathi |
घरातील देवांच्या
पूजेबरोबर, हा सण ज्या वारी आला आहे, त्या वाराच्या आधिपतीची पूजा केली जाते.
पूर्वी गुढी उभारण्यासाठी
चांदीचा कलश व जरी वस्त्र वापरले जात. आजसुद्धा ही प्रथा आहे आता वस्त्राच्या ऐवजी
भगवा झेंडा काठिला बांधून, त्यावर गडू किंवा छोटा तांब्या उपडा ठेवून, त्यावर फुलांची भरगच्च माळ, साखरमाळ
बांधतात व गुढी तुलशी-वृंदावनाच्या बाजूला बांधली जाते.
या दिवशी कडूलिंबांच्या कोवळया पानात, हरभर्याची दाळ, ओवा,मीठ, गूळळ
घालून हे मिश्रण वाटले जाते. नंतर घरातील सर्वांना हा प्रसाद म्हणून दिला जातो.
याप्रकारे शुभ कृत्यांचा मंगल मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा .
Read also
- रामनवमी
- दिवाळी
- दशहरा
khup chan gudipadwa marathi wishes aahet
ReplyDelete