अॅपव्दारे करा शाळाबाह्यमुलांची नोंद
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण |
शिक्षण हा सर्व बालकांचा
मुलभुत हक्क आहे. मात्र तसे असूनही आजच्या घडीला अनेक बालके शालेय शिक्षणापासून
वंचितच आहेत. असे असले तरीही आता शाळाबाह्य मुले दिसताच आता तुम्ही त्यांची नोंद
एका अॅपव्दारे करू शकता.
सक्तीचे प्राथमिक शिक्षण |
‘आयडेंटिफाय किड’
असे या अॅपचे नाव असून चाकं शिक्षणाची, कलम टीम आणि नाशिक महानगरपालिकाशिक्षण मंडळाने एकत्रितपणे हे अॅप विकसित केले आहे. या अॅपव्दारे शाळाबाह्य मुलाचा
फोटो,वैयक्तिक माहिती , शाळा सोडल्याचे कारण आदि तपशील चुटकीसरशी अपडेट करता येते .
in marathi |
तसेच डुप्लीकेट एंट्रीही करता येत नाही, हे विशेष ! या अॅपचा गैरवापर होऊ नये यासाठी हे अॅप इन्स्टॉल
करण्यासाठी पॅन कार्ड नंबर आधारकार्ड नंबर देणे अनिवार्य करण्यात आले आहे . सध्या
या अॅपव्दारे ४३१ शाळाबाह्य मुलांना
शोधण्यात आले असून , त्यांपैकी २०० मुलांना विविध शाळांमध्ये प्रवेश घेऊन देण्यात
आल्याची माहिती चाकं शिक्षण संस्था व मनपाशिक्षण मंडळाने दिली .
Real also
Real also
0 comments:
Post a Comment