ईश्वरनिष्ठ तत्त्वज्ञ
न्यायमूर्ती रानडे
nyaymurthi rande mahiti
ईश्वरनिष्ठ तत्त्वज्ञ
न्यायमूर्ती रानडे
जन्म – दि.१८ जाने.१८४२
मुत्यू- दि.१६ जाने.१९०१ (५९ वर्ष )
नाव – महादेव गोविन्द रानडे
‘महाराष्ट्र ज्यावेळी थंड गोळा होऊन
पडला होता त्यावेळी हर प्रयत्नाने त्याला उब देऊन नव चैतंन्य निर्माण केले ते
न्यायमूर्ती रानड्यांनीच ‘ - अशा आशयाचे उद्गार लोकमान्य टिळकांनी ज्यांच्याबद्दल
काढले असे न्यायमूर्ती रानडे
उत्कृष्ट लेखक , अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद ,चिकित्सक म्हणून नावाजलेले .
खरे तर न्या. रानडेंच्या काळात देशात अतिशय बिकट परिस्थिती होती. महाराष्ट्रात तर
चैतन्यहीन , दिशाहीन ,करुण सोडणारा काळ होता . परकीय सत्ता बळकट झाली होती. नवी
संस्कृती नवे आचार – विचार ,भिन्न परंपरा सांगणारी होती त्यामुळे जनतेला नेमके कसे
वागावे हे समजत नव्हते. अशा परिस्थितीत न्या.रानड्यांनी आपल्या गाढ अभ्यासातून
मार्ग शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला .
Read also:-
- शिवाजी महाराज
- दादाभाई नौरोजी
- बाबासाहेब आंबेडकर
सामान्य जनतेची प्रगती व्हावी आणि राज्यकर्त्यानी त्यास विरोध करू नये अशा धोरणाने
त्यांनी एकेक उद्योग हाती घेतले व ते जनतेमध्ये रुजवून यशस्वी केले. वृत्तपत्रे ,
वसंतव्याख्यानमाला, या व्दारे जनतेला शहाणे करण्याचा प्रयत्न केला . प्रार्थना समाजाची निर्मिती केली व व्यापक धर्मतत्त्वाची ओळख करुण दिली. पुनर्विवाह उत्तेजक संस्थांव्दारे
सामाजिक सुधारणांना चालना दिली. सार्वजनिक सभेव्दारे राजकीय जागराचे आणि उध्योगाचे
मार्ग काढले. त्यांची मंद वाटचाल पण भक्कम स्वरुप यामुळेच ते नावारुपाला आल्याचे
दिसून येते.
0 comments:
Post a Comment