महावीर जयंती- mahavir jayanti mahiti
महावीर जयंती- mahavir jaiyanti mahiti in marathi
वर्धमान महावीर माहिती |
सार्या जगाला प्रेम आणि शांती, अहिंसा आणि अपरिग्रह यांचा सनातन संदेश देणारे
भगवान महावीर याच पवित्र भूमित जन्माला आले. जैनांत २४ तीर्थकर झाले. त्यापैकी
शेवटचे तीर्थकर वर्धमान महावीर होते. २३ वे तीर्थकर पार्श्वनाथ यांनी चातुर्यामधर्म सांगितला होता. तो अस्तेय, अहिंसा, सत्य व अपरिग्रह या चार तत्त्वांवर
आधारलेला होता. त्यात महावीरांनी ब्रम्ह्चर्याची भर घातली आणि तो पंचव्यामधर्म झाला.
bhagwan mahavir jayanti |
स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाचा प्रसार करुन स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार
दिला. त्यावेळच्या परिस्थितीनुसार महावीरांनी घेतलेला निर्णय फारच धाडसाचा होता. त्यांनी
हिंसेला केलेल्या विरोधामुळे वैदिक धर्मात यज्ञयागातील हिंसा निषेधार्थ ठरवली
गेली.
जैन धर्म के सिद्धांत |
अशा थोर धर्मवीराचा जन्म सनपुर्व सहाव्या शतकात मगधातील कुंडग्राम येथे
झाला.महावीर बालपणापासूनच चिंतनशील होते. कालांतराने वैराग्यशील बनले. वासनांचा व
मोहाचा त्याग करुन, त्यांच्यावर विजय मिळवणारे ते जितेंद्रिय होते. त्यांचाछळही झाला
परंतु त्यांनी तो न बोलता सहन केला. त्यांच्या विचारांचे महत्व अनन्य साधारण आहे.
जैन लोकांची शाकाहार,
अहिंसा आदी तत्त्वे सर्वांनाच हितकारक आहेत. आजच्या समाजात जैन लोक शांतीप्रिय व
परोपकारी घटक मानले जातात. आपणही महावीर जयंतीदिनी आपल्या मनातील हिंसा, व्देष, असूया
यांचा त्याग करुन त्यांच्या पवित्र चरणी विनम्र होऊया.
Read also:-
thanks for sharing useful marathi information
ReplyDelete