jagadish chandra bose mahiti in marathi, jagdish chandra bose information in marathi, जगदीश चंद्र बोस मराठी माहिती,
जगदीश चंद्र बोस का जीवन परिचय
वनस्पतीच्या संवेदना जाणणारा शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस
जगदीश चंद्र बोस |
जन्म- 30 नोव्हेंबर 1858 विक्रमपूर बंगाल
मुत्यू – 23 नोव्हेंबर 1937 गिरीधी बंगाल (78 वर्ष)
ढाक्का जिल्ह्यातील विक्रमपूर परगन्यात फरीदपुर या गावी 30 नोव्हेंबर 1858
साली जगदीशचंद्रांचा जन्म झाला. भगवानचंद्रांनी जगदीशच्या वडिलांनी- एका अट्टल
गुन्हेगाराला कारावासाची शिक्षा दिली होती. व पुढे त्यालाच त्यांनी आपल्या घरी
नोकर म्हणून ठेवले. त्याने लहानपणी बुद्धिमान जगदीशला आपल्या पुर्वजीवनातील चित्तथरारक
आठवणी, वन्य जीवन, पशु-पक्षी, वनस्पती यांच्या गोष्टी सांगितल्या. स्वभावतःच
निसर्गप्रेमी जगदीशने मन वन्य जीवनाने भारुन
गेले. व पुढे ते निसर्गनिरीक्षक बनले.
jagdish chandra bose mahiti in marathi |
कलकत्याला त्यांनी शालेय व् माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. जीवशात्र व वनस्पतिशास्त्र
हे त्यांचे आवडते विषय होते. इंग्लंडमधे गेल्यावर त्यांनी ख्राइस्ट कॉलेजमधे नाव
नोंदवले. 1884-85 सालात ते केंब्रिज व लंडन विद्यापीठाचे पदवीधर झाले. त्यांचे प्रारंभिक
संशोधन विद्धुतलहरीचे होते. एका प्रयोगात त्यांनी 75 फूट अंतरावर असणारी घंटा मधे
3 भिंती असताना विद्धुतलहरीच्या साहाय्याने वाजवून दाखविली. मार्कोनीचे नोबेल
प्राईझ त्यांना मिळाले असते पण परतंत्र भारतात त्यांना आर्थिक साह्यासाठी शासनाची
मदत मिळाली नाही.
· हे सुद्धा वाचा
त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. पेरिस येथील जागतिक विज्ञानपरिषदेत त्यांनी ‘सजीव
आणि निर्जीव यांतील साम्य’ या विषयावर आपला प्रबंध वाचला. त्यामुळे पुढे ‘रडार’ चा
शोध पाश्चात्य वैज्ञानिकांनी लावला. जगदीशचंद्रांनी एका प्रयोगात एक पान, एक गाजर
व नवलकोल यात सौम्य विद्धुतप्रवाह सोडला प्रवाह सोडला व वनस्पतीमधून उमटणारी प्रतिक्रिया
अभ्यासली व प्राण्यांप्रमाणे वनस्पतीनाही संवेदना असते हे सिद्ध केले. क्लोरोफोर्ममुळे
वनस्पतींना गुंगी येते. मुळाशी मद्य ओतले तर पाने उत्तेजित होतात. विशप्रयोगाने
रोपटी मरतात. वनस्पतीविश्वात संशोधन करताना लागणारी अत्यंत तरल, संवेदनाक्षम, काटेकोर,
अचूक वेध घेणारी उपकरणे त्यांनी स्वत: तयार केली होती.
jagdish chandra bose biography in marathi |
कलकत्ता येथे त्यांनी बोस रिसर्च इंस्टीट्यूट ही संस्था काढली.
27 नोव्हेंबर, 1937 साली या विज्ञाननिष्ठ कर्मयोग्याने जगाचा निरोप घेतला,
तेव्हा वृक्षवल्लींनी दु:खाचे नि:श्वास सोडले.
महामानव सण बोधकथा
सुविचार
Very Useful Blog and keep share more information on Essay on Jagdish Chandra Bose in Hindi
ReplyDelete